▪️संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्या बाबत निवेदन..
▪️सखोल चौकशी करून संबंधित सराईत गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात यावी..

सौ. शिल्पा बंनपुरकर : संपादक
अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : संविधानाच्या चौकटीत राहून सामाजिक आणि ऐतिहासिक सत्यांचा पुनर्विचार करून विचार मांडणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत अधिकार आहेत. परंतु सामाजिक संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर काही तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांनी हल्ला करत काळे फासले. ही घटना अत्यंत निंदनीय,असंविधानिक व लोकशाही मुल्यांच्या विरोधा करणारी आहे. छत्रपती,फुले, शाहू,आंबेडकरांचे विचार घेऊन. बहुजन समाजात महाराष्ट्रभर काम करणारे प्रवीण दादांनी आजवर ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर विचारपूर्वक भाष्य केले आहे. समाजातील वंचित घटकातील होतकरू तरुणांना रोजगाराचे एक मोठे व्यासपीठ त्यांनी तयार करून दिले आहे. त्यांचे विचार पटोत वा न पटोत, त्यावर प्रतिवाद करणे हे लोकशाही मार्गानेच व्हावे हीच संविधानाची अपेक्षा आहे. परंतु त्यांच्या वैचारिक भूमिकेला हिंसक विरोध करून त्यांना लक्ष्य करणे, हा सामाजिक अहिंसेच्या तत्त्वांचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान आहे.
तरी, आम्ही खालील मागण्या करीत आहोतः सदर घटनेची सखोल चौकशी करून संबंधित सराईत गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात यावी. अश्या प्रकारच्या घटना पुन्हा महाराष्ट्रात होऊ नयेत म्हणून प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी. अशा हिंसक घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो म्हणून दोर्षीवर तातडीने कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी.
आपण याची गंभीर दखल घेऊन तातडीने कठोर शासन कार्यवाही कराल. हेच विनंती अन्यथा महाराष्ट्रभर बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने तुम्हाला देतो. निवेदन देता वेळेस संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी सम्राट अशोक सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होतो. महापुरुषांच्या नावाच्या जय घोषणा देऊन या घटनेचा आम्ही निषेध केला. जाहीर निषेध. सम्राट अशोक सेना.