▪️जिबगांव येथे मोठ्या उत्साहात तान्हापोळा महोत्सव साजरा..
▪️शेकडो नंदी बैल व हजारो नागरिकांच्या उपस्थितीने गाजले महोत्सव*

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
सावली – ( इंडिया 24 न्युज ) : जिबगांव येथे संस्कृतीचा वारसा जपत परंपरेनुसार यावर्षी सुद्धा तान्हापोळा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विदर्भातील हा एक खास सण आहे,जो लहान मुलांच्या आनंद आणि उत्साह वाढविण्यासाठी साजरा केला जात असतो.आधुनिक शेतीविषयी लहान बालकांना माहिती व्हावी तसेच शेतीविषयी आवड निर्माण व्हावी.आज आधुनिक शेती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे कारण बदलत्या काळात बैल, नागरनी यांचा वापर कमी होतांना दिसते.
अगोदर च्या दिवशी गावातील शेतकरी आपली बैलजोडी सजावट करून गावातील मंदिरात नेऊन त्यांना पूजित असतात त्याच पद्धतीने तान्हापोळा या दिवशी लहान मुले आपली लाकडी किंवा मातीचे छोटे नंदीबैल सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढतात, तर मोठे शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करतात. हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. जो शेतीमधील त्यांच्या महत्त्वाच्या योगदानाचा उत्सव आहे.
आज जिबगांव युवा मित्रपरीवार जिबगांव तर्फे तान्हापोळाचे आयोजन करण्यात आले.
युवा मित्रपरिवार जिबगांव तर्फे नंदीबैल सजावट स्पर्धा जुनी हनुमान मंदिर च्या प्रांगणात करण्यात आले होते. गावातील बालगोपालांनी आपापली बैल सजावट करून आणले होते. गावातील गावकरी तसेच बाहेर गावावरून तान्हापोळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.त्यामुळे बालगोपालांमध्ये उत्साह दिसत होता. तसेच बाकी बाल गोपालांचे मनोबल वाढविण्यासाठी टिफीन बॉक्स व पाणी बॉटल भेट म्हणून देण्यात आले.
पुरस्कार वितरण करताना व्यासपीठावर युवा मित्र परिवार जिबगांव व जिबगांव येथील प्रतिष्ठित नागरीक, महिला-पुरुष तथा बालगोपाल मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
त्यानंतर मंदिरात नंदिबैलांची पूजा करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

