▪️कवितेच्या घरातर्फे बापुरावजी पेटकर काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर सोहळा आणि पुस्तक प्रकाशन समारंभ..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
वरोरा – ( इंडिया 24 न्युज ) : ता.२६ -०८-२०२५. कवितेचे घर,शेगांव बु द्वारा वर्ष २०२४-२०२५ या कालावधीत कविता,गझल आणि बालकविता अशा तीन विभागासाठी बापुरावजी पेटकर पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या पुरस्कारासाठी
महाराष्ट्र आणि इतर बाहेरील राज्यातूनही १५० च्यावर संग्रह प्राप्त झालीत. प्रत्येक विभागासाठी रु ५०००/- असे पुरस्कार आहेत. या सर्व पुस्तकांचे राज्यातील नामांकित कवी,समीक्षक,प्राध्यापक मंडळींनी परीक्षण केले आहे.
मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग,घोडपेठ,चंद्रपूर येथे पुरस्कार जाहीर सोहळा आयोजित केला असून या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखक आणि शल्य चिकित्सक डॉ.शरद सालफळे, प्रसिद्ध लेखक आणि समीक्षक प्रा.श्रीकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात..
चंद्रपूर येथील प्रसिद्ध डॉक्टर माधुरी मानवटकर यांच्या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशनही होणार आहे. या पुस्तक प्रकाशनाला चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान.पुलकित सिंग,IAS हे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंद्रपूर आकाशवाणी च्या निवेदिका हेमा बहादे या करणार आहेत. अशी माहिती कवितेच्या घराचे कार्यवाह डॉ.प्रमोद नारायणे यांनी दिली.
तरी इच्छुक मंडळीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे.
अशी विंनतीही करण्यात आली यावेळेस कवितेचे घराचे सभासद श्रीकांत पेटकर,किशोर पेटकर, डॉ संदीप भेले आणि सूर्यकांत पाटील उपस्थित होते.



