▪️हायवे वरील अर्धवट बांधकामामुळे शिवणी वासीय त्रस्त आ. डॉ. मिलिंद नरोटें यांना निवेदन..
▪️शिवणी वासियांचा आंदोलनाचा इशारा..
*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : चामोर्शी–गडचिरोली मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 353C वर शिवणी गावापासून पोटफोडी नदीपर्यंत कंत्राटदाराने अर्धवट ठेवलेल्या रस्ता व पुलाच्या कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील जवळपास एक वर्षापासून हे बांधकाम ठप्प असून, रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे गावकरी तसेच वाहनचालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, दुचाकी व जड वाहने ये-जा करतात. मात्र अर्धवट रस्ता, खड्डे आणि धुळीचे लोट यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून नागरिकांना श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ
शेत मालाचे मोठे नुकसान
अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य असे चित्र कायम आहे.
या पार्श्वभूमीवर युवा वर्ग तसेच शिवणी वासीयांनी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांना निवेदन देत तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली आहे. कंत्राटदार व संबंधित विभागाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, लवकरात लवकर रस्ता व पुलाचे काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन काम सुरू करावे,अन्यथा लोकांच्या संयमाचा बांध फुटेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.सुधीर मुनघाटे लोमेश ठाकरे वैभव गेडाम महेश धारणे मनोज उईके आर्यन चौधरी आदित्य कुद्रपवार वैभव भोयर उपश्टित होते.

