▪️रामाळा तलाव स्वच्छता मोहिमेला गती , ईकोर्निया वनस्पती हटवण्यासाठी अत्याधुनिक मशीनरी कार्यरत..
▪️तलाव संवर्धनासाठी आ. किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न, पाहणी करून अधिक सूचना..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : रामाळा तलाव सौदर्यीकण आणि संरक्षण यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर निधीतून घेण्यात आलेल्या तरंगत्या यंत्राच्या माध्यमातून रामाळा तलाव स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. सदर कामाची आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी करत अधिका-यांना सुचना केल्या आहे. सदर मशीनरी रामाळा तलाव स्वच्छतेत उपयुक्त ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी उपायुक्त चिद्रावार, यांत्रिकी सहायक अभियंता चोरे, पाण्यापूरवठा कनिष्ठ अभियंता चोरे, महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, विधानसभा प्रमुख दशरथ ठाकूर, महामंत्री रवी गुरुनूले, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, संजीव सिंग, राकेश बोमनवार, तेजा सिंग, सुबोध चिकटे, नितेश गवळी, आदींची उपस्थिती होती.
आ. किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक व निसर्गरम्य रामाळा तलावाची स्वच्छता आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. अनेक वर्षांपासून तलावाच्या पृष्ठभागावर पसरलेल्या इकोर्निया या जलवनस्पतींमुळे तलावातील पाण्याचा प्रवाह, जलजीवन व सौंदर्य या तिन्ही गोष्टींवर प्रतिकूल परिणाम होत होता. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून आता विशेष यांत्रिक साधनांची मदत घेतली जात आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी मंजूर केलेल्या निधीतून महानगरपालिकेच्या वतीने आणण्यात आलेल्या या अत्याधुनिक यांत्राद्र्वारे ईकोर्निया वनस्पतींचे मोठ्या प्रमाणावर उच्चाटन सुरू आहे. मशीन पाण्यात तरंगत राहून थेट पृष्ठभागावरील व मुळांसकट वनस्पती गोळा करून बाहेर काढते. यामुळे स्वच्छतेचे प्रमाण व गती दोन्ही वाढले असून, अल्पावधीतच तलाव वनस्पतीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
आज आमदार किशोर जोरगेवार यांनी रामाळा तलावावर भेट देऊन सुरू असलेल्या कामाची सखोल पाहणी केली. मशीनरीची कार्यपद्धती, कामाचा वेग आणि स्वच्छतेचा परिणाम याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
यावेळी ते म्हणाले, रामाळा तलाव हे फक्त जलस्रोत नसून चंद्रपूर शहराची ओळख आहे. या तलावाचे संरक्षण, संवर्धन आणि सौंदर्यवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छतेनंतरही सातत्याने देखभाल केली तरच हे कार्य दीर्घकाळ टिकेल असे ते म्हणाले. आ. जोरगेवार यांनी काम अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी तसेच साफ केलेल्या वनस्पतींचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या मोहिमेमुळे तलावातील पाणी प्रवाह सुधारेल, ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल, पाण्यातील जैवविविधतेला चालना मिळेल आणि तलाव परिसर पुन्हा एकदा नागरिकांसाठी स्वच्छ, निसर्गरम्य ठिकाण म्हणून उजळून निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.