आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️देवा मंडलवार यांच्या नेतृत्वात चिखल – मय रस्त्यावर बसून केले रस्ता रोको आंदोलन..

▪️15 दिवसात रस्ता दुरुस्त न केल्यास दिले उपोषनास बसण्याचा इशारा..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र.9403179727

मूल (इंडिया २४ न्यूज ) : सिंदेवाही ते टेकरी हा रस्ता खूप जास्त वर्दळीचा आहे. या रस्त्यावरून टेकरी, वाकल, वाणेरी, जामसाळा (जुना), जामसाळा( नवीन), मोहाळी, नलेश्वर, पांगडी, तसेच आदिवासी मुला, मुलींचे वसतिगृह येथील विद्यार्थी तसेच नागरिक रोज ये जा करतात. तसेच सिंदेवाही आठवडी बाजार पण याच रस्त्यावर भरतो .पण गेले काही दिवसापासून हा रस्ता खूपच खराब झाला आहे. जागो जागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात घडून येत आहेत .परिणामी शाळा कॉलेज ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तसेच शहराला जाणाऱ्या नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यासाठी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी . सात दिवसांमध्ये या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास होणाऱ्या अपघातास बांधकाम विभागास कारणीभूत ठरविण्यात येईल तसेच त्याच खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचे निवेदन युवा कार्यकर्ते देवा मंडलवार यांच्या नेतृत्वात मा. उपविभागीय अभियंता( जी. प. ) बांधकाम उपविभाग मुल यांना दिनांक 25 जून 2025 रोजी देण्यात आले होते .पण प्रत्यक्षात प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे आज दिनांक 04 जुलै 2025 रोज शुक्रवारला युवा नेते देवाभाऊ मंडलवार यांच्या नेतृत्वात प्रत्यक्षात रस्त्यांवरील खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नायब तहसीलदार तुमराम यांना निवेदन देण्यात आले व 15 दिवसात उचित कारवाई करण्यात आली नाही तर तहसील कार्यालय सिंदेवाही येथे आमरण उपोषण करण्यात येईल .असा इशारा सुद्धा देण्यात आला .यावेळी वाकलचे उपसरपंच दिनेश मांडाळे टेकरीचे उपसरपंच विजय नैताम , मोहाळी येथील सामाजिक कार्यकर्ते तेजराम नन्नावरे ,महेश मंडलवार , सागर गेडाम , अक्षय चहांदे , दुर्वास मंडलवार , हेमाबाई खोब्रागडे , यशवंत सूर्यवंशी , मंगेश गायकवाड , कृष्णा मेश्राम , भगवान शेरकुरे , अशोक सूर्यवंशी , धनराज वाकडे , पुरुषोत्तम ढोणे , वाणेरी येथील विनायक पेंदाम, जामसाळा येथील प्रवीण चौके, नलेश्वर येथील मोरेश्वर गायकवाड , पांगडी येथील रामचंद मसराम तसेच परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.