ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भटक्या श्वानांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून दरमहा वीस लाख निधी मिळतो, तो निधी नेमका जातो कुठे?

▪️संदिप शिरसाट ( वॉर्ड बॉय ) सांभाळतो व्यवस्थापकाची कामे..

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभुळकर

नवी मुंबई – ( इंडिया 24 न्युज ) : महानगरपालिकेमधून भटक्या श्वानांसाठी देखभाल तसेच औषधोपचारासाठी दर महा वीस लाख निधी मिळतो. म्हणजेच वर्षाला दोन कोटी 75 लाख. एवढा निधी नेमका जातो कुठे हेच कळत नाही. शहरात भटकी श्वाने आजारपणामुळे मृत्यू पावतात. तक्रारी आल्यानंतर त्यांना इंजेकशन देऊन सोडून देतात, व कालांतराने ते मरण पावतात. यासाठी जर नवी मुंबई महानगरपालिका खर्च करीत असेल तर अश्या पालिकेचा जाहीर निषेध.
श्वान आजारी असल्यास आणि एखाद्या प्राणी प्रेमीने संबंधित विभागाला फोन केल्यास चांगले सहकार्य मिळत नाही. उलट उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तात्काळ सेवा ण मिळाल्यामुळे गेल्या हप्त्यामध्ये तीन भटके श्वान दगावले. आठवड्यातून फक्त चारच दिवस (सोम ते गुरु) पशु परिवेक्षक उपलब्ध असतात.उर्वरित दिवसात जर एखादा श्वान जखमी झाल्यास त्याला उपचारासाठी कुठे न्यायचा हा प्रश्न उभा राहतो. एवढा निधी मिळून देखील योग्य व तात्काळ सेवा मिळत नसेल तर अश्या विभागाचा उपयोग काय. कधी डॉक्टर वेळेत उपलब्ध होत नाही. तर कधी त्यांचा फोन व्यस्त असतो. सप्ताहातून एक दिवस देखील श्वान गस्त पथक रस्त्यावर दिसले नाही. सदर विभागात डॉ. घनवट , परब, लोंढे तसेच पशुपरीवेक्षक हुके, रोहित, व इतके कर्मचारी असताना देखील कामात एवढा हलगर्जीपणा का केला जातो? पशु परिवेक्षक अमित हुके कर्तव्य बजावत असताना मद्य प्राशन करून भटक्या श्वान वर उपचार केले जातात यांची वारंवार तक्रार करून सुद्धा मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही वारंवार तक्रारीचा पाठपुरावा करत असताना यांना कोणतेही नोटीस आजपर्यंत बजावलेली नाही यांच्याविरुद्ध किती पशुप्रेमीने वारंवार तक्रार करून सुद्धा आज तागायत ठोस कारवाई केलेली दिसून आलेली नाही
नवी मुंबई महानगरपालिका व आयुक्त महोदय यांनी या बाबत तातडीची चौकशी लावून संबंधितांवर योग्य कारवाई करावी अशी प्राणीमित्र संघटनेची मागणी आहे.

सुबोध सावंत – पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता तथा पशुप्रेमी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.