आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️सहाशे रुपयात चाळीस हजाराचे पिक विमा संरक्षण प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन..

संपादक – शिल्पा बनपूरकर

धुळे, दि. 2 ( इंडिया 24 न्यूज ) : प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत रब्बी हंगाम 2023 करीता उन्हाळी भूईमुग ला सहाशे रुपयात 40 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर, 2022 पर्यंत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन एस. डी. मालपुरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत पीक, विमा हप्ता व संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे- हरभरा पिकासाठी विमा हप्ता-562.5, विमा संरक्षित रक्कम-37,500, गहु बागायत विमा हप्ता-675, विमा संरक्षित रक्कम-45,000, रब्बी कांदा विमा हप्ता-4,000, संरक्षित रक्कम-80,000 असून सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर, 2022 अशी आहे. तर उन्हाळी भुईमुग पिकासाठी विमा हप्ता-600 तर विमा संरक्षित रक्कम-40,000 रुपये असून सहभागी होण्याची अंतिम तारिख 31 मार्च, 2023 आहे.
*योजनेची चित्ररथाद्वारे जनजागृती*
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची जिल्ह्यात व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी व्हावी, याकरीता कृषि विभागामार्फत चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या रथास सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. डी. मालपुरे, कृषि उपसंचालक विठ्ठल जोशी यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आय.सी.आय.सी.आय लोम्बार्ड कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी वसीम शेख, कृषि व महसुल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेतक-यांनी रब्बी हंगामातील पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या जवळील सी.एस.सी सेंटर तसेच बँकेत संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. मालपुरे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.