▪️राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या इशारा..

*🔸श्री. सचिन ढगे*
*🔸चंद्रपूर तालुका प्रतिनिधी*
*🔸मो. नं. 9359692716*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : गेल्या 15 ते 20 वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने अधिकारी कर्मचारी कार्यरत आहे. शासनाने 14 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 10 वर्षपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात नियमित शासन सेवेत समायोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे . परंतू गेली 16 महिन्यापासून त्याची अंमलबजावणी शासन स्तरावर अद्याप करण्यात आली नाही . त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे 71 संवर्गातील नियमित समायोजन तात्काळ करावे या मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 ला बेमुदत काम बंद आंदोलनाची हाक दिली .या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होणार असून शासनाने त्याची त्वरित दखल घ्यावी .जेणेकरून आरोग्य सेवा ही सुरळीत चालू राहिल.