▪️मुरमाडी येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे सामान्य ज्ञान परीक्षा..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
मुरमाडी : ( इंडिया 24 न्युज ) – लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करणात आले. दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी शुक्रवारला रात्रो ठीक 9 वाजता सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे 6 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींची सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धा परीक्षेला मंडळाच्या वतीने बक्षित ठेवण्यात आले. या परीक्षेचे प्रमुख मार्गदर्शक दुर्गा मंडळाचे माझी अध्यक्ष तथा महात्मा गांधी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक हितेंद्र लंजे, प्रशांत लंजे , निकेश गहाणे, महेश लांजेवार, हे होते. या स्पर्धा परीक्षेला विविध प्रश्न देण्यात आले होते. या स्पर्धा परीक्षेसाठी 6 ते 18 वर्षाखालील जवळपास 70 ते 75 मुला मुलींनी सहभाग घेतला. ही परीक्षा पारदर्शक व्हावी या करिता आशिष लांजेवार, पवन गहाणे, भागेश्वर लांजेवार, व मंडळाच्या सर्व सदस्यांनी मोलाची भूमिका पार पाडली या परीक्षामध्ये गुणांनुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळातर्फे योग्य बक्षीस देण्यात येणार आहे.



