▪️लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांचे परभणी येथे जंगी स्वागत..
▪️पत्रकारांच्या एकजुटीने प्रश्न मार्गी लागतील : संजय देशमुख

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
अकोला : ( इंडिया 24 न्युज ) : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय तथा संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांचे परभणी येथे लोकस्वातंत्र्य परभणी जिल्हा पत्रकार संघटनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. पत्रकारांनी एकजुटीची दबावशक्ती निर्माण करावी,त्यांचं माध्यमातून आपले प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल असे प्रतिपादन संजय देशमुख यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करतांना केले. परभणी येथील जनसहयोग सेवाभावी संस्था व क्राईम ईनव्हेस्टीगेशन ब्यूरो या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मेरी जान तिरंगा या कार्यक्रमाचे आयोजन संजय देशमुख यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले होते.याप्रसंगी राष्ट्रभक्ती पर गीतगायन आणि महात्मा गांधी राष्ट्रीय सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात आले.या निमित्ताने हा परभणी दोरा होता.याप्रसंगी परभणी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला केंद्रीय कार्यकारिणीचे सल्लागार पुष्पराजदादा गावंडे, विदर्भ विभागीय संघटन प्रमुख डॉ. शंकरराव सांगळे, मार्गदर्शक विजय बहाकर अकोला जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांचेही तेथील कार्यकारिणीने यथोचित स्वागत केले. यावेळी जबरदस्त संघटन साधणारे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर
महाराष्ट्र संघटन- संपर्क प्रमुख भगीरथजी बद्दर,मराठवाडा विभागीय संघटन प्रमुख देवानंद वाकळे, मयुर देशमुख जिल्हाध्यक्ष (ग्रामीण), युसुफखान पठाण (पदाधिकारी), वाजिदभाई पठाण (डिजीटलमिडीया विभागीय संघटन प्रमुख), प्रमोद अंभोरे (जिल्हा कार्याध्यक्ष), नामदेव चापके (जिल्हा सचिव), राजकुमार इंगळे, अब्दुल कलीम, एन. नुरूद्दीन जावेद सिध्दीकी (शहराध्यक्ष नांदेड), शिवाजी चव्हाण (तालुका अध्यक्ष,गंगाखेड), रवि साबळे आरोग्यदूत/रुग्णसेवक, दिलीप बुरुड, हरदिपसिंग बावरी, मोहम्मद युनुस मोहम्मद सत्तार, प्रशांत वाटुरकर, मोहम्मद अशफाक मोहम्मद कुराण, सैय्यद सोहेल, शाहबाज खान सोहेब अली मो. अली, तोहीम खान जावेद खान, संदीप वायवळ, अब्दुल खालिद, सोहेल सेठ़ उमेश अग्रवाल (फोटो ग्राफर) आदींची उपस्थिती होती. यावेळी महेमूद खान नजीर खान यांची परभणी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करणृयात आली.त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
बॉक्स
शिंदे शिवसेनेचे लोकसभा प्रभारी राजुभाऊ कापसे,आनंदजी भरोसे या नेत्याकडून
त्यांच्या सहकाऱ्यांकडून परभणी येथील सावली शासकीय विश्रामगृह येथे सकाळी ९ वाजता येऊन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांचे त्यांच्या नगरीत आल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच शासकीय कंत्राटदार / बिल्डर्स सैय्यद गौसभाई यांनी देशमुख साहेब यांचे बुके देवून सत्कार केला व साहेबांसोबत असलेल्या २५ पत्रकारांची आग्रहाने जेवणाची व्यवस्था हॉटेलमध्ये केली. कार्यकारिणीला शुभेच्छा प्रदान केल्या. यावेळी सायबर क्राईमविषयी जनजागृतीचे कार्य करणाऱ्या नारी शक्ती फाउंडेशनच्या फराह अंजूम मॅडम हैद्राबाद तेलंगाना), अॅड. जेबा खान मॅडम (बीड) ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे अध्यक्ष नरसिंग दत्तु गायसमुद्रे (मुंबई) यांची देखिल उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे संचालन दिलीप बनकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद अंभोरे यांनी केली.