▪️अवैध गांजा आणि वाहन असा एकुण 1,74,030/- रु.चा माल जप्त; दोन आरोपी अटक..
▪️आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा नोंदविण्यात..!

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर : ( इंडिया 24 न्युज ) : अवैध रित्या गांजा ची वाहतुक करणाऱ्यां ईसमांविरुध्द कारवाई 10587 कि.ग्रॉ. गांजा व वाहतुकी करीता वापरलेले वाहनासह एकुण 1,74,030/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची कामगिरी.
दिनांक 16 ऑगस्ट, 2025 रोजी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदार कडुन मिळालेल्या खात्रीशिर माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे सापळा रचुन मोटार सायकल क्रमांक MH 34 – 6956 येतांना दिसल्याने त्यास थांबवून पंचासमक्ष सदर वाहन चालक व मागे बसलेल्या इसमाची झडती घेतली असता. त्यांच्या जवळील बाळगलेल्या बॅग मध्ये 1,587 किलो ग्रॉम गांजा अवैधरित्या वाहतुक करीत असतांना. मिळुन आल्याने वाहन चालक व मागे बसलेला इसम आणि रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे (1) दिपक राजु भोले वय 21 वर्ष (2) बिश्वजीत बिमल सिकद्दर वय 32 वर्ष दोन्ही रा. शांतीनगर बंगाली कॅम्प चंद्रपूर यांना ताब्यात घेवुन त्यांचेजवळील अवैध गांजा आणि वाहन असा एकुण 1,74,030/- रु.चा माल जप्त करुन आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 672/2025 कलम 8 (क), 20 (ब), (ii) N.D.P.S. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इमरान खान, पोअं किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, चापोहवा प्रमोद डंभारे, गजानन मडावी सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.