आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा लाडबोरी मध्ये केंद्रीय नवरत्न स्पर्धा आयोजित..

श्री अमोल निनावे
तालुका प्रतिनिधी
मो. नं. 9764271316

लाडबोरी – ( इंडिया 24 न्यूज ) : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाडबोरी च्या वतीने केंद्रीय तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेचे 11 जाने 2023 ला शाळेच्या पटांगणात आयोजन करण्यात आले होते, व्यासपीठावर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सन्मा. किशोर पिसे सर गटशिक्षण अधिकारी प.स सिंदेवाही हे होते , व अध्यक्ष स्थान श्री डी. आर बावनकर सर(शि.वि.अ.) भूषविले होते, तर विशेष अतिथी म्हणून सरपंच ममता चहांदे ,व शाळा व्यवस्थापन समिती लाडबोरी अध्यक्षा, सौ .जोशना कारमेंगे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सिंदेवाही तालुक्यातील संपूर्ण केंद्रप्रमुख उपस्थित होते, कार्यक्रमच्या सुरवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून दीपप्रज्वलन करण्यात आले, नंतर व्यासपीठावर उपस्थित पाहुणे मंडळीचा स्वागत सत्कार करण्यात आला , पाहुण्यांच्या स्वागत करण्याकरिता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाडबोरी मधील विध्यार्थी मुलींनी सदाबहार नृत्य करून पाहुण्याचे स्वागत केले, यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्मा राजश्री देवरावं वसाके मॅडम विषय शिक्षिका करित होत्या,
कार्यक्रमाचे प्रास्तवीक सन्मा.श्री सी एफ आवळे सर यांनी केले, या कार्यक्रमामध्ये
केंद्र स्तरावर निवड झालेल्या विध्यार्थीच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये 1) बुद्धिमत्ता चाचणी, 2) सुंदर हस्ताक्षर 3) वाद विवाद स्पर्धा 4) स्वयंपूर्ण भाषण स्पर्धा 5) कथाकथन स्पर्धा 6) एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धा 7) स्वयंपूर्ण लेखन स्पर्धा 8) स्मरण शक्ती स्पर्धा 9) चित्रकला स्पर्धा या स्पर्धा घेण्यात आल्या, शाळेच्या वतीने संपूर्ण कार्यक्रम योग्य व यशस्वी रित्या पार पडण्यात आला, या स्पर्ध्या मधील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकविणाऱ्या विध्यार्थी व विध्यार्थिनीचा
चा ट्राफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमच्या शेवटी आभार प्रदर्शन सन्मा रमेश जांभुळकर मुख्याध्यापक जी.प.उच्च प्राथ.शाळा लाडबोरी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक म्हणून शाळेतील सहाय्य्क शिक्षक सन्मा. गुरुनुले सर, सन्मा.राहानगंडले सर, सन्मा ठाकरे मॅडम शिक्षिका ,यांनी परिश्रम घेतले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.