आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाकिस्तानात महागाईचा हाहा:कार, गॅस सिलेंडर दहा हजारांवर..

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई (इंडिया 24 न्यूज )पाकिस्तानमध्ये महागाईचा दर वाढला असून मूलभूत सुविधांपासून लोक वंचित राहत आहेत. पाकिस्तानची परिस्थिती बिकट झाली असून तेथील लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. देशातील सरकारनेही ही बाब मान्य केली आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी स्वत:च देश गंभीर स्थितीतून जात असल्याचं मान्य केलं आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर, वीज, जीवनावश्यक वस्तूही सर्वसामान्यांना घेणं त्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे.

साखर, गहू, गॅस सिलेंडर सारख्या गोष्टी महाग होत असतानाच दुसरीकडे पाकिस्तानात विजेचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाकिस्तान सरकारसमोर विजेच्या कमतरतेची मोठी समस्या आहे. पाकिस्तानी डिफेन्स मिनिस्टरने विज वापर कमी करण्यासाठी आदेशही जारी केले आहेत. पाकिस्तानात गरीबी दरातही ३५.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल पॉवर्टी इन्डेक्सच्या यादीमध्ये 116 देशांपैकी 92 व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्तानमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा व एलपीजीचे भाव गगनाला भिडले आहेत. गॅस सिलेंडरसोबतच पीठ, तेल, कांदा, डाळी, दूध, मांसाहार यांसारख्या खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.