आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पैगंबरांवर वादग्रस्त वक्तव्य! दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा यांना दिला स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना..

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई (इंडिया 24 न्यूज )नुपूर शर्मा यांना पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी हा परवाना दिला आहे. प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नुपूर यांना जीवे मारण्याच्या अनेक धमक्या देण्यात आल्या, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना शस्त्र परवाना दिला.

राजस्थान येथील टेलर कन्हैयालाल तर अमरावतीत उमेश कोल्हे यांची नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट केली म्हणून हत्या करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने शर्मा यांना दिलासा देत त्यांची अटक रद्द केली होती. तसेच देशात अनेक ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारी एकाच ठिकाणी वर्ग करण्यात आल्या होत्या. तसेच यापूर्वी सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना फटकारले होते. देशातील बिघडलेल्या वातावरणाला नुपूर शर्मा जबाबदार असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती परडीवाला यांनी केली होती. नुपूर यांनी एकदाही पुढे येऊन माफी मागितली नाही, असेही कोर्टाने ठणकावून सांगितले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.