आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सकाळच्या घडामोडी : 18/01/2023

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

इंडिया 24 न्यूज

▪️महाराष्ट्रात 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक: दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 5 कंपन्यांसोबत करार, 10 हजार तरुणांना मिळणार रोजगार.

▪️धनुष्यबाणावर आता शुक्रवारी सुनावणी: पक्षातंर्गत निवडणुका आयोगाने घेऊ द्याव्या, कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निकाल नको; सिब्बल.

▪️राज्य महिला आयोगाचे मुंबई पोलिसांना आदेश: उर्फी जावेदला संरक्षण द्यावे, चित्रा वाघ यांच्या धमक्यांमुळे हल्ला होऊ शकतो.

▪️सत्यजित तांबेंचे काँग्रेस सोडण्याचे संकेत: ट्विटर, फेसबूकच्या बायोतून पक्षाचे नाव हटवले; म्हणाले – कर्तृत्व सिद्ध करावे लागते.

▪️नाशिक पदवीधरवरुन मविआत कुरबुर?: काँग्रेस, ठाकरेंचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा, अजित पवार म्हणतात- आज अंतिम निर्णय घेऊ.

▪️लातूरमध्ये एसटी पुलावरुन कोसळली: 42 प्रवासी जखमी, 14 जण गंभीर; बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने भीषण अपघात.

▪️कपड्याची बॅग भरूनच नितीन देशमुख ACB च्या दारी: अमरावतीमध्ये 3 तास झाली चौकशी; ठाकरे गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन.

▪️जेपी नड्डा आणखी वर्षभर भाजप अध्यक्ष: लोकसभा निवडणुकीपर्यंत पदावर राहणार, अडवाणी-शहांनंतर सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे तिसरे नेते.

▪️इंडिका कारला भारतात लॉन्च होऊन 25 वर्ष पूर्ण: रतन टाटा यांची भावनिक पोस्ट, म्हणाले – माझ्या हृदयात तुझ्यासाठी आजही खास जागा.

▪️भारतीय संघाला मोठा धक्का, फलंदाज श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतून पडला बाहेर.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.