आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

एन.जी.बागुल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सोनगीर येथे मोफत सायकल वाटप..

विठ्ठल गोयकर – प्रतिनिधी साक्री ग्रामीण

धुळे जिल्ह्यातील सोनगीर विद्या प्रसारक मंडळाचे एन जी बागुल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सोनगीर येथे आज मानव विकास मिशन अंतर्गत इ.8वी ते 12वी चया मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आले ज्या मुलांना शाळेत जाण्यासाठी गाडी ची सोय नाही अशा विद्यार्थींना महाराष्ट्र राज्य शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल देण्याचा निर्णय घेतला तो उपक्रम संपुर्ण महाराष्ट्र भर राबविण्यात येत आहे मुलींना शिक्षण घेताना खुप अडचणी येत असतात खेड्यापाड्यात वाहनांची व्यवस्था नसते मग त्या मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून हि योजना राबविण्यात आली आहे या मोहिमेत शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.धुळे येथील भामरे मॅडम उपस्थित होत्या तसेच सोनगीर केंद्र प्रमुख खैरनार सर होते तसेच एन जी बागुल हायस्कूल सोनगीर चे संस्था अध्यक्ष सुनिल बागुल व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री दुसाणे सर व धनगर सर यांनी केले मुख्याध्यापक श्री विसपुते सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मुलींना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी दुर केल्या जातील असे सांगितले तसेच आभार शाळेचे उप मुख्याध्यापक श्री पाटील सर यांनी मानले यावेळी शाळेचे सर्व शिक्षक इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते असे इंडिया 24 न्युज प्रतिनिधी शी बोलताना सांगितले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.