आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिक्षणाची दैनाः पाचवीतील ८० टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी आणि आठवीतील ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकारही येईना.!!

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई (इंडिया 24 न्यूज )पाचवीच्या 80 टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, आठवीतील 65 टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येईना, राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा करण्यास सांगण्यात आले. ही वजाबाकी फक्त १९.६ टक्के विद्यार्थीच करू शकले. ८०.४ टक्के विद्यार्थ्यांना हे गणित सोडवता आले नाही. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येस एक अंकी संख्येने भागण्यास सांगण्यात आले. हे गणित सोडवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ ३४.६ टक्के आहे. ६५.४ टक्के विद्यार्थ्यांना हे गणित सोडवता आले नाही. शैक्षणिक गुणवत्ता खालावली किमान क्षमता विकास झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांनी घटले आहे. समाधानाची बाब म्हणजे देशपातळीवर शाळाबाह्य मुला-मुलींचे प्रमाण घटले आहे. ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. १५ ते १६ वयोगटातील १.५ टक्के मुले शाळाबाह्य आहेत. ग्रामीण भागातील शाळांमधील पायाभूत सुविधांची उपलब्धताही कमी झाली असल्याचे हा अहवाल सांगतो.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.