आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️भिक्षेकरी महिला व रस्याालवरील बालकांसाठी आरोग्य शिबिर संपन्न..

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर

धुळे, दि. 20 ( इंडिया 24 न्यूज ) : भिक्षेकरी महिला व बालकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, वैद्यकीय सेवा व व्यवसाय प्रशिक्षण देवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार दंडेवाला बाबा नगर, मोहाडी, धुळे येथे सेवा फाउंडेशन, धुळे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने भिक्षेकरी व रस्त्यावरील बालकांसाठी आरोग्य तपासणी व आधार कार्ड नोंदणी शिबीर नुकतेच घेण्यात आले.
बालकांची काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिलेल्या सुचनेनुसार सचिन शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, धुळे यांच्या मार्गदर्शनाने धुळे शहरातील रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅण्ड, प्रमुख देवस्थाने, शहरातील महत्वाचे देवस्थाने, शहरांतर्गत महत्वाचे चौक, गर्दीची ठिकाणे येथे रस्त्यावरील बालके व भिक्षेकरी यांची सर्वेक्षण मोहिम राबविण्यात आली. यासाठी महानगरपालिका, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभागाच्या विविध यंत्रणांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉ. मोहसीन मुल्ला यांनी वैद्यकीय तपासणी केली. मनोविकृती परिचारक ओमकार गुंजाळ, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता सागर घोडेस्वार, किशोर स्वास्थ कार्यक्रमाचे नरेश बोरसे यांनी तपासणी व मार्गदर्शन केले. याप्रसंगी सचिन शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, धुळे, डॉ. उषा साळुंके, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, सदस्य अॅड मंगला चौधरी, अॅड अनिता भांबेरे, श्रीमती सुरेखा पवार, श्री. राकेश नेरकर, परिविक्षा अधिकारी, सतिश चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आदि उपस्थित होते. तसेच सेवा फाउंडेशन, धुळेचे अध्यक्ष, डॉ. चंद्रकला मोरे, सचिव सपना शिरसाठ, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष, रोहित खंडारे, संचालक मायाताई पानपाटील, सदस्य तनया खैरनार, नालंदा महिला गृहउद्योग अध्यक्ष, मंजुळाताई पाटील, निता गांगुर्डे, रत्ना पाटील, आशा सदनोर यांनी कार्यक्रमाचे आयोजनासाठी सहकार्य केले. अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती अनिता पाटील व अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशावर्कर श्रीमती संध्या पाटील, लक्ष्मी पाटील, सखी वन स्टॉप सेंटरच्या पुजा कासार, कृष्णा देवरे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी श्रीमती तृप्ती पाटील, देवेंद्र मोहन, सामाजिक कार्यकर्ता योगेश धनगर, माहिती विश्लेषक देवेंद्र पाटील, क्षेत्रीय कार्यकर्ता दिपक रंधे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.