आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️कुष्ठरोगाविरुध्द लढा देऊया , कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात..!

▪️जिल्हाधिकाऱ्यांचे नागरीकांना आवाहन..

संपादक – शिल्पा बनपूरकर

धुळे, दि. 20 ( इंडिया 24 न्यूज ): केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार धुळे जिल्ह्यात कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हावासियांना कुष्ठरोगाविरुध्द लढा देऊया, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात असे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मी घोषित करतो की, धुळे जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत. कुष्ठरोग हा निदान करण्यास सोपा असून बहुविध औषधोपचाराने पुर्णतः बरा होणारा आजार आहे. रुग्णांना या रोगामुळे भविष्यात होणाऱ्या गुंतागुंती व विकृती टाळण्यासाठी त्याचे लवकर निदान होणे आवश्यक असते. म्हणून, लवकरात लवकर कुष्ठरुग्ण शोधुन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी शक्य असलेल्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत. त्यासाठी जिल्ह्यातील शासकीय व सामाजिक बांधिलकी असलेल्या सर्व यंत्रणांनी या कार्यासाठी मदत करावी.
त्याचवेळी आपल्या सर्वाच्या वतीने मी असेही घोषीत करीतो की, कुष्ठबाधीत व्यक्तीच्याबाबत आपल्यापैकी कोणीही, कोणताही भेदभाव करणार नाही व इतर कोणी त्यांचेबाबत भेदभाव करीत असतील तर त्यांना त्यापासून परावृत्त करावे. आपण सर्वजण वैयक्तीक व एकत्रितरीत्या कुष्ठबाधीतांसोबत कोणताही भेदभाव यापुढे होणार नाही व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील यासाठी अथक प्रयत्न करावे. असेही श्री. शर्मा यांनी आपल्या आवाहनात म्हटले असून “कुष्ठरोगा विरुध्द लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात” असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी घोषणापत्राद्वारे केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.