आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पोलीस स्टेशन गोंडपिंपरी हद्दीती अवैध गोवंश तस्करी,12 जनावरे व वाहन जप्त..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

गोंडपिंपरी – ( इंडिया 24 न्युज ) : पोलीस ठाणे गोंडपिंपरी हद्दीतील मौजा करंजी येथे पोलिसांनी नाकाबंदी करून गोवंश कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत 12 गोवंश जनावरे (किंमत रु. 1, 85,000/- आणि पिकअप वाहन क्र. MH34-BZ-6550 किंमत रु.4,00,000/- असा एकूण रु. 5,85,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे करंजी येथे पोलिसांनी नाकाबंदी केली असता, एक संशयास्पद पिकअप वाहन थांबविण्याचा इशारा दिला गेला. मात्र चालक न थांबता पुढे गेला. पोलिसांनी पाठलाग करताच वाहन चालकाने वाहन दुबागुडा जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
वाहनाची तपासणी केली असता त्यात 12 गोवंश जनावरे दाटेवाटीने बांधून ठेवलेली आढळली, त्यापैकी 4 जनावरे मरण पावलेली होती. जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्याने अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक खुशाल टेकाम, पोलीस कर्मचारी प्रविण कदम व गायकवाड यांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.