आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

गुरुनानक देवजी यांच्या ५५७ व्या जयंतीनिमित्त तथास्तु फाउंडेशन तर्फे रुग्णांना फळ वाटप

धनराज सरपाते- सिंदेवाही तालूका प्रतिनिधी

सिंदेवाही 🙁 इंडिया २४ न्युज) दि.२४ नोव्हें.२०२६
शिखधर्माचे संस्थापक महान संत व समाज सुधारक गुरुनानक देवजी यांच्या ५५७ व्या जयंतीनिमित्त तथास्तु फाउंडेशन सिंदेवाहीच्या वतीने मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

गुरुनानक देवजी यांनी जगाला एकता, समानता, प्रेम, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचा संदेश दिला. सर्व मानव समान असून समाजात बंधुभाव व माणुसकीची भावना रुजविण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत तथास्तु फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांना फळ वाटप करून, सेवाभावाचा आदर्श निर्माण करण्यात आला.

या कार्यक्रमाला तथास्तु फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल उंदीरवाडे, सचिव महंत मेश्राम, कोषाध्यक्ष सुशील वाघमारे, स्वप्निल राऊत, जयंत भेंडाळे व पारस गेडाम सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कैलास भाऊ टहलणीया होते. यावेळी सिंधीसमाजाचे अध्यक्ष मनोज धामेजा, जितेंद्र भवानी, आयुष भवानी यांचीही उपस्थिती होती.

गुरूनानक देवजी यांच्या मानवतावादी विचारांचा वारसा जपत समाजकल्याणासाठी असे उपक्रम राबविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.