आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

” दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीर! चंद्रपूरात MPSC गट -क संयुक्त पूर्व परीक्षेसाठी मोफत सराव परीक्षेचे आयोजन

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर : ( इंडिया २४ न्युज )दि.२४ नोव्हें.२०२६
चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीचा विचार करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक लोकाधिकार सेना व शिवसेनेच्या वतीने MPSC गट – क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी मोफत सराव परीक्षा मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.

” दुष्काळ गंभीर, शिवसेना विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर!”
या ब्रिदवाक्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये आणि त्यांना परिक्षाची योग्य तयारी करता यावी, हा उपक्रमामागील हेतू आहे.

चार टप्प्यात होणार सराव परीक्षा

ही मोफत सराव परीक्षा मालिका एकूण चार टप्प्यात घेण्यात येणार आहे. प्रत्येक रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत तुकूम येथील मातोश्री विद्यालयात परीक्षा पार पडणार आहे.

परीक्षेचे वेळापत्रक :
रविवार ६ डिसेंबर २०२६
रविवार १३ डिसेंबर २०२६
रविवार २० डिसेंबर २०२६
रविवार ३ जानेवारी २०२७
गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे :

विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रत्येक सराव परीक्षेमध्ये टॉप ३० येणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक कॉलेज बॅग भेट देऊन गौरविण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

QR कोड द्वारे नोंदणीचे आवाहन :
चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मोफत उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकानी केले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी पोस्टरवर दिलेल्या QR कोड स्कॅन करून सराव परीक्षा मोहिमेत सहभागी व्हावे, असेही कळविण्यात आले.

मान्यवराचे मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

हा उपक्रम चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक लोकाधिकार सेना, शिवसेनेचे अध्यक्ष गोमती शारदा मनोहर पाचभाई यांच्या नेतृत्वात, तसेच MPSC सराव परीक्षा अभियान प्रमुख अमित महाजनवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. अभियान कार्यवाहक प्रा. शुभांगी आसुटकर, मयूर पाऊनकर, विभागीय प्रमुख साईनाथ उपरे, (चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा ) जगदीश पचारे (वरोरा, भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी) हे विशेष परिश्रम घेत आहेत.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष अडव्होकेट संदीप धानोरकर, सरचिटणीस समीर आवारी, खजिनदार अडव्होकेट मृणालीनी रागीट,उपाध्यक्ष इंजि. प्रशांत कोपुला, अडव्होकेट प्रशांत गिरडकर, अडव्होकेट प्रेमा आईचवार, इंजि. मनोज कांबळे, चिटणीस इंजि. अभिजीत खडसे,महेश चिंतारकर, बंडू पहानपटे, कार्यकारी सदस्य डॉ. आशिष आसुटकर, कोमल मोहीतकर, सुवास पानघाटे, सचिन धिपे, स्वामी रागीट, संतोष पाचभाई यांच्यासह सर्व पदाधिकारी व MPSC अभियान सदस्य कार्यरत आहेत.

ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवती कडून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.