▪️बेंबाळ -जुनासुर्ला जि. प. क्षेत्रातून युवा रणरागिणी सौं. सुलभाताई अमोल चुदरी यांची दावेदारी
▪️महिला युवा नेतृत्व येणार जि. प.च्या रणांगणात..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४न्यूज ) : जिल्हा परिषद निवडणूकीचे ग्रामीण भागात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशिल असलेला बेंबाळ -जुनासुर्ला जि. प. क्षेत्र हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटासाठी साठी आरक्षित झाला आहे. जि. प. निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या काही दिवसातच जि. प. निवडणूकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. अशातच बेंबाळ – जुनासुर्ला जि. प. गटातून पंचायत समिती मूल चे माजी उपसभापती श्री. अमोल पाटील चुदरी यांच्या धर्मपत्नी सौं. सुलभाताई अमोल चुदरी यांनी आपली दावेदारी केली आहे.सौं. सुलभाताई चुदरी यांचे पती श्री. अमोल पाटील चुदरी हे भारतीय जनता पार्टीचे खंदे समर्थक असून ते पंचायत समिती मुलचे उपसभापती होते. त्यांच्या कारकिर्दीत मूल तालुक्यात अनेक पायाभूत सुविधा पुरविल्या.तालुक्यातील ग्रामीण भागाला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले जनसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपच्या सर्व गटांशी सलोख्याचे संबंध व व्यापक जनसंपर्क असून ते परिसरातील जनतेच्या हितासाठी सदैव पुढाकार घेत असतात. अश्या वेळी सौं. सुलभाताई चुदरी यांनी आपले पती श्री. अमोल पाटील यांना खांद्याला खांदा लावून साथ दिली. त्यांना सुद्धा समाजसेवेचा वारसा लाभलेला आहे. मृदुभाषी असलेल्या सौं. सुलभाताई चुदरी ह्या शांत, संयमी असून त्यांचे अंगी समाजसेवेची तळमळ आहे.
सौं. सुलभाताई अमोल चुदरी यांना बेंबाळ -जुनासुर्ला जि. प. क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाकडून संधी मिळाल्यास या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल व पक्षाला बळ मिळेल आणि मतदारांची भरभरून साथ मिळेल हे मात्र निश्चित.



