▪️तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भिक्षी गावातील दोन विद्यार्थ्यांचे सुयश..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी : ( इंडिया 24 न्युज ) – पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येत असलेल्या भगवंतराव हायस्कुल तथा कनिष्ठ कला महाविद्यालय लखमापूर बोरी मध्ये शिकणाऱ्या गट ग्रामपंचायत हळदी चक अंतर्गत येत असलेल्या भिक्षी या अगदी छोट्या गावातील तसेच गरीब कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांने सध्या सत्र 2025-2026 अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील विक्रमपुर येथे सुरु असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सुयश मिळविले आहे.
तालुक्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत दि. 03/10/2025 ला विक्रमपूर येथील क्रिडांगणावर पार पडलेल्या विविध वैयक्तिक मैदानी क्रीडा स्पर्धेत भगवंतराव हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय, लखमापूर बोरी येथील इयत्ता 8 वी तील आरुषी शिवाजी मोटघरे हिने 14 वर्षे वयोगटातून 600 मी. मुलींच्या रनिंग स्पर्धेत तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे, तर वर्ग 11 वी तील करण गणपती ठाकूर याने 19 वर्षे वयोगटातून 800 मी. मुलांच्या रनिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शाळेचे मुख्यध्यापक तथा प्राचार्य माननीय स्वर्णकार सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने या दोन्हीही विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आलेले आहे व यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



