डॉक्टर कृष्णा नसून उच्चशिक्षित इंजिनीयर एजंट निघाला अभियंता..!

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज)
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे या शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात किडनी विकली. त्या संपूर्ण घटनेने महाराष्ट्रसह केंद्रातही मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. सावकाराच्या दबावात येऊन किडनी विकली असे प्रकरण समोर आले. ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यासाठी एसआयटी स्थापन केली. त्या टीम मध्ये नऊ लोक काम करीत होते. माहिती मिळाली की मुख्य आरोपी डॉ. कृष्णा हाही किडनी डोनर आहे. तो सुशिक्षित अभियंता सुद्धा आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
त्या प्रकरणात सहा सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. फेसबुक वरील किडनी डोनर कम्युनिटी या फेसबुकच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात आले. कृष्णा याने आपण डॉक्टर असल्याचे कुडे यांना सांगितले. डॉक्टर कृष्णा व पुढे यांच्यात व्हाट्सअप वर चाटच्या माध्यमातून संपर्क होते.
किडनीचे मोठे राकेट असल्याची माहिती चंद्रपूर मधील विशेष पोलीस दलाचे पथक तयार करून सोलापूर येथील किडनी विक्री प्रकरणातील डॉक्टर कृष्णा याला ताब्यात घेतले. डॉक्टर कृष्णा यांचे नाव असून त्याचे खरे नाव मल्लेश असे आहे. तो डॉक्टर नसून उच्चशिक्षित इंजिनीयर समोर आले. त्याला चंद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या किडनी रॉकेट प्रकरणातील एजंट डॉक्टर कृष्णा यांच्याबाबत माहिती दिली. या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे राज्यातील आणखी काही जिल्ह्यात पसरले आहेत की काय यासंदर्भात काही तपास सुरू आहे. डॉक्टर कृष्णा यांनीही आपली किडनी डोनर केल्याची माहिती समोर आली. त्याच्यावर मानवी अवयव तस्करी विरोध कायदा (हुमनट्याँपीक) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.



