एन.जी.बागुल हायस्कूल सोनगीर येथे विज्ञान दिन साजरा..
विठ्ठल गोयकर
प्रतिनिधी साक्री ग्रामीण
मो.8459472797
धुळे जिल्ह्यातील सोनगीर विद्या प्रसारक मंडळाचे एन. जी बागुल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सोनगीर, तालुका जिल्हा धुळे, येथे 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन अतिशय उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आले , तसेच, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ विज्ञान विषय शिक्षक आदरणीय श्री. एन. यु. ठाकरे सर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री एच. एस. विसपुते, उपप्राचार्य श्री के.एन. पाटील संस्था अध्यक्ष बापूसाहेब सुनिल बागुल, सामाजिक कार्यकर्ता,अमित बागुल,वैभव बागुल ,पर्यवेक्षक श्री . व्ही. एस. सोनार सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधू-भगिनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय श्रीपर प्रा. वाय. बी. धनगर सरांनी केले तसेच अध्यक्ष भाषणात विज्ञान विषयाची सखोल माहिती आदरणीय प्राचार्य दादासो श्री एच. एस. विसपुते सरांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यालयात विज्ञान दिनानिमित्त अपूर्व विज्ञान मेळावा भरवण्यात आले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली…_