ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

नवी मुंबई गावठाण भागात देखील स्वच्छता अभियान राबवावे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचा उपक्रम

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

नवी मुंबई(इंडिया 24 न्यूज )महाराष्ट्र भूषण आदरणीय डाॅ.ति.श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त डाॅ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महास्वच्छता अभियान नवी मुंबई येथे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत राबविण्यात आले.
महाराष्ट्र भूषण डॉ .ति .श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी चे औचित्य साधत डॉ श्री नानानसाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने बुधवारी ता (1) संपूर्ण भारत भरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई शहरात पद्मश्री डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते
महाराष्ट्र भूषण डॉ . ति .श्री धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने हे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये शहरातील हजारोहुन अधिक श्री सदस्य सहभागी झाले होते, त्यांच्यावतीने शहरातील सार्वजनिक परिसर, रुग्णालये, रस्ते, महाविद्यालये, शाळा, शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती .
नवी मुंबई शहरातही हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते, यामध्ये शहरातील 4 हजार 306 श्री सदस्यांच्या श्रमदानातून हि मोहीम पूर्ण करण्यात आली . त्यांच्यावतीने शहरातील 255 किलोमीटरचा परिसर साफ करत 25 .900 टन कचरा जमा करून तुर्भे क्षेपण भूमीवर जमा करण्यात आला.सुका कचरा उचलण्यासाठी -16 वाहने वापरण्यात आले होते .सदरील स्वच्छता मोहीम ही मनपा हद्दीतील आठ विभागात राबविण्यात आली होती. याारिसरात राबविण्यात आली होती . यावेळी श्री सदस्यांनी शहरातील रेल्वे स्थानक परिसर तसेच पामबीच मार्ग ,ठाणे बेलापूर रोड व सायन पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला ..प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत .यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब रांजले उपस्थित होते.

सदरील उपक्रम हा खूपच चांगला आहे.जसे शहरीभागात स्वच्छता अभियान राबविण्यात येते तसेच गावठाण भागात देखील राबविले जावे.प्रतिष्ठान कडून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.वृक्षारोपण ,स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम हे समाजहितकारक आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.