ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

महागाईचा झटका घरगुती एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग..

 

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई (इंडिया 24 न्यूज )मार्च महिन्यातील पहिल्याच दिवशी खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. महागाईनं सर्वसामान्य लोकांना आणि गृहिणींना मोठा झटका दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता मुंबईत सिलेंडरचे दर 1,102 रुपये 50 पैसे आणि नागपूरला 1,154 रुपये 50 पैसे झाले आहेत.

होळीपूर्वी महागाईचे चटके सामान्य माणसाला बसणार आहेत. याशिवाय 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर ३५०.५० रुपयांनी वाढले आहेत. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढण्याची शक्यता आहे.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार 14.2 किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीत 1103 रुपयांना मिळणार आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर 350 रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत आजपासून 19.2 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी 2119.5 रुपये मोजावे लागणार आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.