ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महानगर उपाध्यक्षपदी – मोहन खंडारे

 

संपादक – शिल्पा बनपूरकर

अकोला : ( इंडिया 24 न्यूज ) – स्थानीक शासकीय विश्रामगृह येथे पिपल्स रिपब्लिकन पार्टीची बैठक संपन्न.या बैठकीत जिल्ह्यातील कार्यकर्ता उपस्थित होते.या बैठकीत पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी येणाऱ्या आगामी निवडणुकी विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.व सांगितले की कार्यकर्त्यांनी आता सुस्त बसु नये.मिटींग ठेवुन जिल्हाभरात पक्षाचे कार्य सुरू ठेवावे. बैठकीत पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, जगन्नाथ गुल्हाने, अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुणाताई गुल्हाने,जिल्हाध्यक्ष नागसेन क्षीरसागार, जिल्हा उपाध्यक्ष अनील गवई महानगर अध्यक्ष हिम्मत हिवराळे, देवेंद्र सिरसाट,मूतिजापूर तालुका अध्यक्ष शेषरावं अंभोरे,मदन भगत,व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बैठकीत पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अकोला महानगर उपाध्यक्षपदी मोहन रतन खंडारे यांची निवड करण्यात आली.हि नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते देण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.