आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️आनंद माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

वरोरा – ( इंडिया 24 न्यूज ) : आनंद माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन २७ फरवरी 2023 ला जी.प.उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समितीचे विश्वस्त तथा आनंद माध्यमिक विद्यालय शाळा समितीचे उपाध्यक्ष सुधाकर कडू यांची उपस्थिती होती.तर प्रमुख अतिथी योग शिक्षक दिपक शिव ,संधी निकेतन अपंगांची कर्मशाळा अधीक्षक तथा शाळा समिती संचालक रवी नलगींटवार ,शाळा व्यवस्थापन समिती कोषाध्यक्ष सारिका सौसागडे, आनंदवन ग्रा.प.सचिव विद्या गिलबिले ,उपसरपंच शौकत खान,शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गोखरे , नहाले सर,शिव ताई यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व श्रद्देय बाबा व ताईच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलित करण्यात आली.त्यानंतर वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत स्वागत नृत्यांनी केले.तसेच कार्यक्रमाप्रसंगी दिपीका मेश्राम व कशीश परचाके या विद्यार्थिनींने गोंडी नृत्य सादर केले.

तदनंतर कार्यक्रमाच्या प्रस्ताविकाचे वाचन शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गोखरे यांनी केले.
शाळेचे सहा.शिक्षक मयुर गोवारदिपे यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर शाळेतर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत विजयी विद्यार्थी चमुंना मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

आयुष्यात माणूस झिरो असतो परंतु चांगले कार्य करीत राहिले तर हिरो होतो
प्रश्नाचे उत्तर तंतोतंत बरोबर व सुंदर अक्षरात लिहिले तर पेपर तपासणारे शिक्षक खुष होऊन आकर्षित होतात.चांगला माणूस शाळा-महाविद्यालय घडवीत असते.फक्त आम्ही अनाद्वानांतीलच आहो असे सांगत असतांना आपल्यात असलेले गुण ते सुद्धा सांगायचे असतात.आज आनंदवनातला मुलगा शास्त्रज्ञ झाला आणि देशाला कोरोनाची लस दिली.आज आनंदवनातील भूमीकडे पहा लोकांना सौंदर्य दिले नाही परंतु स्वतः त्यांनी सौंदर्य निर्माण केले.आयुष्यात माणूस झिरो असतो परंतु चांगले कार्य करीत राहिले तर हिरो होत असते.तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा तुम्ही निश्चितच दहावी बोर्ड परीक्षेत यश संपादन कराल असे महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी दहाव्या वर्गाच्या विद्यार्थी निरोप समारंभामध्ये आपल्या अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त केलं.
प्रमुख अतिथी रवी नलगगीन्टवार यांनी
गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांमुळे शाळेची गुणवत्ता व चांगला दर्जा टिकून राहतो.शाळा उत्तम निकाल देतो आहे.जिथे शंका नाही तिथे आनंद व उत्सव असला पाहिजे.वर्षभर केलेला अभ्यास तीन तासात उतरावा लागतो.मुद्दे कठीण असतात त्याला अडचण नाही.पहिले हस्ताक्षर महत्वाचे असून उत्तरे सोडविणे आवश्यक आहे.टक्क्यांनी आयुष्य घडत नाही.श्रद्देय बाबा आमटे म्हणायचे की,ज्याची स्पर्धा स्वतःशीच आहे त्याला जिंकेल कोण?दुसऱ्याकडे बघून आपले जीवन घडविता येत नाही.तणावरहित राहून तुमची उत्तर पत्रिका उत्तरानी भरा आणि सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवा असे विचार संधी निकेतन अपंगांची कर्मशाळा अधीक्षक रवी नलगिंटवार यांनी व्यक्त केले.
प्रमुख अतिथी दिपक शिव सर यांनी मराठी भाषा दिनाचे महत्व समजावून सांगितले आहे.त्यांनी मराठी भाषेचे जतन झाले पाहिजे.आपले मराठी भाषेतील लिखाण हे शुद्ध तसेच र्हस्व दिर्घ कळले महत्वाचे असून वेलांटी ला महत्व आहे एखादी वेलांटी चुकली तरी शब्दाचा व वाक्याचा अर्थ बदलतो असे विचार व्यक्त करून दहावीच्या विद्यार्थ्यांना यशोमयी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या लोहकरे व ऋतुजा जांभुळे यांनी केले तर आभार शिक्षक आशिष येटे यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहा. शिक्षक प्रदीप कोहपरे,मयुर गोवारदिपे,आशिष येटे, निशा येरणे,स्मिता काळे व लिपिक प्रकाश नाकाडे,परिचर ज्योती सिंग,संदीप कोडवाते यांनी परिश्रम घेतले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.