आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️रुग्णसेवा, महिला, शेतकरी व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी वरदान ठरणारा अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभूळकर

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा आहे. या अर्थसंकल्पात नवी घरकुल योजना, शेत विम्यासाठी मोठी तरतुद, महात्मा ज्योतीराव फुले जिवनदायी आरोग्य योजनेतील निधीमध्ये वाढ अशा महत्वकांशी घोषणा करण्यात आल्या असुन हा अर्थसंकल्प रुग्णसेवा, महिला, शेतकरी व मध्यमवर्गी कुटुंबांसाठी वरदान ठरणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी नव संजीवनी ठरणार असुन यामध्ये रुग्णसेवेवर भर देण्यात आला आहे. आता ज्योतीराव फुले जिवनदायी आरोग्य योजनेतील निधीमध्ये भरघोस वाढ करित लाभार्थांना दिड लाख रुपये एैवजी आता पाच लाख रुपयापर्यंत आर्थिक सहायता प्राप्त होणार आहे. निराधारांच्याही मानधनात 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. रमाई आवाज योजनेसाठी मोठ्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अतंर्गत शेतकर्यांना 12 हजार रुपयांचा सन्मान निधी दिल्या जाणार आहे., पंतप्रधान पिक विमा योजनेचे पैसे आता सरकार भरणार आहे. इतर मागासवर्गीयांसाठी तिन वर्षात 10 लाख घरांची नवी मोदी आवाज योजना सुरु करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. रमाई आवास योजने अंतर्गत दिड लाख घरे बांधण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पातील या घोषणा सक्षम महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.