आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️राज्यातील जनतेला महावितरण देणार वीज दरवाढीचा शॉक ‘एवढ्या’ टक्क्यांनी होणार वाढ.?

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई (इंडिया 24 न्यूज )महावितरण लवकरच सर्वसामान्यांना एक मोठा झटका देणार आहे. महावितरणने वीजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या दरवाढीचा प्रस्ताव वीज आयोगासमोर मांडला आहे.

महावितरणची कोट्यावधी रुपयांची थकबाकी ग्राहकांच्या माध्यमातून अदा होत नसल्याने महावितरण तोट्यात आहे. आता ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणने 37% वीजदर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. जर का हा प्रस्ताव मान्य झाला तर 2 रुपये 55 पैसे प्रति युनिट इतकी दरवाढ होणार आहे. या दरवाढीमुळे घरगुती, व्यावसायिक, शेतकरी अशा सर्वच श्रेणीतील नागरिकांना बसणार आहे.

निश्चितच वीज आयोग या प्रस्तावावर काय निर्णय घेते आता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. परंतु एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टनुसार, वीज आयोग पंधरा टक्के वीजदरवाढीवर सकारात्मकचा निर्णय घेईल आणि 15% इतकी वीज दर वाढ होऊ शकते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.