▪️गडचांदूर प्रकरण : आरोपीवर FIR नोंद व अटकेची मागणी, महिला आयोगाकडे तक्रार..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
गडचांदूर – ( इंडिया 24 न्युज ) : परिसरातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणी तक्रारदारांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात रुपली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या Maharashtra State Women Commission यांना निवेदन देण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, 24 डिसेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात कविता भीम प्रकाश आकेवार यांनी लेखी तक्रार दिली होती. त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी गडचांदूर पोलीस ठाणेदार येथील अधिकाऱ्यांना आरोपीवर FIR दाखल करून अटक करण्याचे तोंडी आदेश दिल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप योग्य कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, पीडित भीम प्रकाश आकेवार यांना स्थानिक दबावामुळे नोकरीवरून काढण्यात आले. यामध्ये अनिल नगराळे यांचे नाव समोर आले आहे, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
तसेच आरोपीने वारंवार गावातील महिलांना मारहाण केल्याचा आरोप असून, यापूर्वी फक्त NCR दाखल करून हलकी कारवाई करण्यात आली, असेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हे प्रकरण गडचांदूर नवेगाव परिसरात घडले असल्याचे सांगितले जाते.
निवेदन : महाराष्ट्र राज्य मादगी संघटना यांनी दिले. त्यात प्रामुख्याने उपस्थित डॉ.पसुला जी समय्या संस्थापक अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष राजश्याम फुलोरी, माजी पोलीस पाटील आकेवार, बबलू आकेवार, अनिल बदलवर, रवी डबलवार, सुभाष शिंदेकर, शंकर पेगदपलीवर, अरुण पारखी, शंकर चिलमूलवार, शेखर चलमूलवार, श्याम चेन्नरुवार, दिलीप इंग्रवार आणि समस्त समाज बांधव उपस्थित होते


