▪️मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने बांधला वनराई बंधारा..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : मारोडा ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत पुढाकार घेत स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने तात्पुरता बांध उभारला. पाणीसाठा वाढवणे,शेतीसाठी सिंचनाची सोय सुधारणे आणि गावातील पाण्याची समस्या कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्रमदानासाठी पुढे आले. सिमेंटच्या पोत्यांनी बंधारा तयार करण्यात आला, पाण्यात उतरून मजबूत बांध घालणे अशी कामे सर्वांनी मिळून पूर्ण केली. महिलांचाही या उपक्रमात विशेष सहभाग दिसून आला.
ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “गावाच्या विकासासाठी शासनाच्या योजनांबरोबरच ग्रामस्थांचे प्रत्यक्ष योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. श्रमदानातून उभारलेला हा बांध गावासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.”
या बांधामुळे आगामी हंगामात पाणी उपलब्धता वाढेल, पिकांना पुरेसे पाणी मिळेल आणि स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. ग्रामस्थांनी व ग्रामपचायत एकजुटीने केलेले हे काम परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.ग्रामपंचायत मारोडा,पंचायत समिती चामोर्शी व ग्रामपंचायत मारोडा कर्कपल्ली जवळील नाल्यावर श्रमदानातून 500 पिशव्यांचा मोठा वनराई बंधारा बांधण्यात आला यावेळी उपस्थित सरपंच अनिल झुरे,डि. टी. हरडे ग्राम पंचायत अधिकारी,पुरुषोत्तम बोरकुटे, रजनीकांत सातपुते ग्राम पंचायत शिपाई,लेखाजी नैताम ग्राम पंचायत कर्मचारी,विनोद कोहळे रोजगार सेवक, चंद्रशेखर लोळे ग्राम पंचायत ऑफरेटर,सुमित्रा झुरे पेसा मोबिलायझर,पितांबर बारसागडे,महादेव वाळके व गावातील नागरिक उपस्थित होते



