घुग्घुस शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर तातडीने नियंत्रण आणावे – सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांची मागणी..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*
घुग्घुस – ( इंडिया 24 न्युज ) : आज दि.4/08/2026
घुग्घुस शहरात अलीकडच्या काळात चोरी, लूटमार, मोबाईल चोरी, महिलांची छेडछाड, ज्येष्ठ नागरिकांवरील हल्ले, दागिने हिसकावण्याचे प्रयत्न तसेच अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीचे विदर्भ सचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी घुग्घुस पोलीस निरीक्षक यांना सविस्तर निवेदन सादर करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, घुग्घुस शहर औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होत असून विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर कामगार रोजगारासाठी येथे येत आहेत. उद्योग आणि रोजगाराचे स्वागत असले, तरी कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक शांतता यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
नुकत्याच घडलेल्या एका स्टॅम्प विक्रेत्याच्या लुटीची घटना तसेच एका ८० वर्षीय महिलेवर हल्ला करून तिचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न या घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. याशिवाय मोबाईल चोरी, महिलांची छेडछाड आणि इतर गुन्ह्यांबाबतही नागरिकांकडून तक्रारी पुढे येत आहेत.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्याही व्यक्ती, समाज, राज्य किंवा रोजगारासाठी आलेल्या कामगारांना या घटनांसाठी जबाबदार ठरविण्याचा हेतू नाही. मात्र, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने कायदेशीर आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यासाठी पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
उद्योगांमध्ये कार्यरत बाहेरून आलेल्या कामगारांची नियमानुसार पोलीस पडताळणी.
भाडेकरू पडताळणी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी.
कामगारांच्या वस्त्यांमध्ये नियमित दिवस-रात्र पोलीस गस्त.
रविवारच्या आठवडी बाजारात विशेष पोलीस बंदोबस्त.
महिला पोलीस व सिव्हिल ड्रेसमधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
मोबाईल चोरी, पाकीटमारी आणि महिलांच्या छेडछाडीवर नियंत्रणासाठी विशेष पथक.
दारू व अमली पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात विशेष मोहीम.
संवेदनशील भागात सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करणे.
पोलीस, उद्योग प्रतिनिधी, व्यापारी आणि नागरिकांची संयुक्त बैठक आयोजित करणे.
सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी सांगितले की, “घुग्घुस शहरातील प्रत्येक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच रोजगारासाठी आलेले सर्व कामगार सुरक्षित राहिले पाहिजेत. सार्वजनिक सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने तातडीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ही मागणी कोणत्याही समाज किंवा राज्याविरुद्ध नसून, कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आहे.”
यासंदर्भातील निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, नगर परिषद, लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.
यावेळेस शरद पाईकराव, चंद्रपूर जिल्हा महासचिव सौ. रिताताई फकरु देशकर, राकेश कातकर, जगदीश मारबते, अशोक भगत राकेश पारशिवे, दत्ता वाघमारे, बबन वाघमारे विजय कवाडे.



