आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पोलीस स्टेशन गडचांदूर येथील गुन्हे शोध पथकाची सिनेस्टाइल वाहनाचा..

▪️पाठलाग करून 35 गोवंश जनावराची सुटका आरोपी ठोकल्या बिड्या गुन्हा दाखल..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यातील दि. 05/08/2026 रोजी गुप्त बातमीदाराकडुन गोपनिय माहिती मिळाली की, चंद्रपूर मार्गाने ते भोयगाव ते गडचांदूर मार्गान एक टाटा कंपनीचा 12 चाकी ट्रक वाहन कमांक एम.एच.27 एक्स 8886 मध्ये गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरीता घेवुन जाणार आहे. अशा माहिती वरून पोलीस स्टॉप नी मौजा भोयगाव येथे नाकाबंदी करून दिनां 06/08/2026 रोजी चे पहाटे 03/30 वा. दरम्यान एक ट्रक हा भोयगाव कडे येतांना दिसला सदर वाहनास नाकाबंदी दरम्यान हाताच्या इशाराने थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालक यांने आपले ताब्यातील वाहन हाताच्या इशारा देवुन सुध्दा नाकाबंदी दरम्यान न थांबता भरधाव वेगाने गडचांदूर मार्ग तेलंगना राज्या कडे जात असतांना सदर वाहनाचा पोलीस स्टॉफ नी पाठलाग करून व वरीष्ठांना माहिती देवुन नमुद वाहनास मौजा परसोडा फाटा ता. कोरपना जि. चंद्रपूर येथे थांबवीले असता ट्रक चालक यांनी आपले ताब्यातील वाहन थांबवुन जंगलाच्या दिशेने पळुन गेला त्याचा पाठलाग केला असता मिळुन आला नाही. सदर वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये एकुण 35 नग गोवंश जातीचे जनावरे लहान मोठे (बैल) एकुण किंमत 7,00,000/- रूपये, ट्रकच्या कॅबीने मध्ये पंचासमक्ष पाहणी असता कॅबीन मध्ये गुन्हयात वापरलेला मोबाईल कि.अं. 1000/- रूपये व गुन्हयात वापरलेला ट्रक कि.अं. 15,00,000/- रूपये असा एकुण 22,01,000/- रूपयेचा मुद्येमाल मिळुन आल्याने सदर माल पंचासमख पंचनामा कार्यवाही करून जप्त केला आहे. जप्त जनावरे सुरक्षीतते दृष्टीने तसेच वैद्यकिय तपासणी करीता व चारापण्याची व्यवस्था करणे करीता प्यार फाउंडेशन चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.

तरी सदर ट्रक चालक/मालक आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन गडचांदूर येथे अपराध क्रमांक 409/2026 कलम 11 (1), (घ) (ड) (च) (ज) भारताचा प्राण्यांना कुरपणे वागविण्यास प्रतिबंध अधि. 1960 सहकलम 5 (अ).5 (ब), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनीयम, सहकलम 325,281 भा.न्या.सं. सहकलम 184,239 मोवाका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील कार्यवाही सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सा., मा.अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव सा.उपविभाग गडचांदूर यांचे मार्गदर्शनात पो.नि.शिवाजी कदम पोलीस स्टेशन गडचांदूर यांचे नेतृत्वाताखाली पोउपनि पंकज हेकाड, नापोअं. बलवंत शर्मा, साईनाथ उपरे, पो.अं. मनोहर जाधव, सुरज ढोले, प्रकाश बाजगीर, राजरतन बोरूडे यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.