▪️डॉ. मंगेश गुलवाडे यांची माध्यमांसाठी प्रतिक्रिया..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : “आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आवाहनाला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद ठेवून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि आधुनिक वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आपली एकजूट दाखवून दिली आहे.
आमचे आंदोलन कोणत्याही वैद्यकीय शाखेविरोधात नाही. आमची भूमिका फक्त एवढीच आहे की आधुनिक वैद्यक करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला आवश्यक ते सर्वसमावेशक MBBS शिक्षण आणि क्लिनिकल प्रशिक्षण मिळालेले असावे. हा विषय सध्या मा. मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे अंतिम न्यायालयीन निर्णय होईपर्यंत CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी स्थगित ठेवावी, ही आमची मागणी आहे.
रुग्णांचे हित, सुरक्षितता आणि आधुनिक वैद्यकीय व्यवसायाची गुणवत्ता जपण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन पुढेही ठामपणे कार्य करत राहील. आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर, नागरिक आणि प्रसारमाध्यमांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”



