▪️नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे एटापल्लीत बैलाचा अपघाती मृत्यू..
▪️मोकाट जनावरांच्या समस्येकडे तात्काळ लक्ष देण्याची नागरिकांची मागणी..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
एटापल्ली – ( इंडिया 24 न्युज ) : २० जून २०२५ रोजी रात्री ११:३४ वाजता एटापल्ली शहरातील राजीव गांधी चौक येथे एक दुर्दैवी घटना घडली. रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट बैलाचा अपघातात मृत्यू झाला. या करुण घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे, तसेच मोकाट जनावरांच्या वाढत्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही केली जात आहे.
एटापल्ली शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरे रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसत असून, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांच्या तक्रारी असूनही नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी या समस्येकडे फारसे लक्ष दिलेले नाही, असा स्थानिक नागरिकांचा सूर आहे.
या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव कॉ. तेजस गुज्जलवार यांनी सांगितले की:
शहरात मोकाट जनावरांमुळे वारंवार अपघात होत असून, ही बाब केवळ वाहतुकीपुरती मर्यादित नाही, तर ती जनसुरक्षेशी संबंधित आहे. कालची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे.
कॉ. तेजस गुज्जलवार यांनी असेही नमूद केले की, “*नगरपंचायतीने या समस्येवर ठोस उपाययोजना आखाव्यात, मोकाट जनावरांच्या व्यवस्थेसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी आणि त्यांच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी घ्यावी.
शहरातील या समस्येवर तोडगा निघेपर्यंत भाकपा प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.