▪️महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला मेळावे काळाची गरज – स्नेहल तराळे

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : मराठा पाटील समाजातील महिलांमध्ये उच्चतम गुणवत्ता, कौशल्य व उद्योजकीय क्षमता आहे. बदलत्या काळात केवळ घरातील एका व्यक्तीच्या उत्पन्नावर अवलंबून राहणे कठीण होत चालले असून महिलांनी धाडसाने छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय उभारणे अत्यावश्यक आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला मेळावे होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन यशस्वी व्यावसायिका तथा स्नेहश्री फॅशन हबच्या संचालिका स्नेहल तराळे यांनी केले.
मराठा पाटील संघ, बाळापूर यांच्या वतीने भय्यूजी महाराज आश्रम, निमकर्दा येथे आयोजित कौटुंबिक महिला मेळाव्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती कुसुमताई किसनराव राऊत व जयश्री बाळासाहेब ताथोड उपस्थित होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती राजे शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर रेखा राऊत, मालूताई पोहरे, मीनाक्षी नकासकर, सीमा वानखडे, कांचन साबळे, ममता इंगोले, कोकिळा माळी, ज्योती टाले, दिपाली मुरूमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. दिपाली घोगरे यांच्या प्रभावी सूत्रसंचालनात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सामान्य ज्ञान स्पर्धा, प्रज्ञावंत महिला व विद्यार्थ्यांचा सत्कार, फॅशन शो, खेळ पैठणीचा अशा विविध उपक्रमांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खेळ पैठणी स्पर्धेतील पैठण्या गुरुदेव ड्रेसचे संचालक मोहन सराफ यांच्या सौजन्याने देण्यात आल्या. तसेच विविध स्पर्धांच्या माध्यमातून मिस पाटील बाळापूर व मिसेस पाटील बाळापूर यांची निवड करण्यात आली. यावेळी स्नेहल तराळे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाची सांगता जिजाऊ वंदनेने करण्यात आली. यावेळी सीमा वानखडे, गायत्री वानखडे, मीनाक्षी वानखडे, मालूताई पोहरे, मोनिका लांडे, स्वाती पाटील, उज्वला बढे, कोकिळा माळी, मीनाक्षी नकासकर, दिपाली घोगरे, सुचिता घोगरे, मेघा घोगरे, स्नेहल तराळे, गौरी काळे, पूजा काळे, रुपाली ठाकरे, ज्ञानेश्वरी माळी, प्रीती तायडे, उमा तायडे, गोकुळा तायडे, आशा तायडे, दिपाली मुरूमकर, उमा दांदळे, अशिका मुरूमकर, जान्हवी दांदळे, खुशी दांदळे, ज्योती टाले, प्रतिभा पाथ्रीकर, डॉ. ममता इंगोले, विभा पाथरकर, अश्विनी काळे, जयश्री घोगरे, स्वाती माळी, योगिता लताड, संगीता माळी, सीमा निर्मळ, गंगाताई भरणे, दिपाली पारसकर, सुनीता वानखडे, श्रद्धा खेळकर, रुपाली लांडे, सौ. पारस्कार, रितिका लांडे, विद्या साबळे, मीना साबळे, कु. श्रद्धा साबळे, नीता गावंडे, सौ. उषा योगेश भटकर, सौ. रूपाली विवेक सरप, सौ. नेहा सचिन सरप, सौ. वैष्णवी सागर मानकर, सौ. मीराबाई जनार्दन गावंडे, सौ. वर्षा संतोष सरप, सौ. दिपाली शुभम मानकर, अॅड. सविता खोटरे, अॅड. प्रतिभा जाणोरकर, ज्योती गावंडे, पल्लवी वानखडे, अर्चना वानखडे, संगीता जाणोरकर आदींसह बाळापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
महिला सक्षमीकरण, उद्योजकता आणि सामाजिक एकात्मता यांचा सुंदर संगम या मेळाव्यात पाहायला मिळाला. महिलांनी विविध क्षेत्रात पुढे येत समाज विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.



