आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️धानोरा पंचायत समितीचे आपीलीय अधिकारीच कार्यालयात दिसेनासे..!

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : सामाजिक कार्यकर्ते व मानव धिक्कार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चोखाजी ढवळे यांनी धानोरा पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेले विस्तार अधिकारी बबलु आत्राम. विस्तार अधिकारी कविता रामटेके यांच्या विरोधात माहितीचे अधिकार घेतली होते.
.त्यांनी या दोघांच्या विरोधात अपील सुध्दा केली होती.
आज मंगळवार दिनाक ,07.04.2026 लl पचायत समिती मध्ये अपील ठेवली असता. परंतु धानोरा अपिलीय अधिकारी हेमके या कार्यालयामध्ये अनुपस्थित असल्यामुळे अपिलीय सुनावणी घेण्यात आलेली नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते चोखाजी ढवळे यांनी अपिलीय अधिकारी यांच्या प्रशासनार नाराजी व्यक्त केलेली आहे.
धानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पन्नेमारा जप्पि. कामणगड, सोडे. देवापूर, गोडल वाही, मुरुमगाव.कुलभट्टी चिचोडा, गट्टा. व अन्य ग्रामपंचाती, भ्रष्टाचारणी फोख रलेल्या आहेत. कार्यरत असलेल्या भ्रष्ट ग्रामसेवकांना हे दोन्ही विस्तार अधिकारी ग्रामसेवकांच्या भ्रष्ट कामाची कुठलीही चौकशी न करता उलट भ्रष्ट ग्रामसेवकांना प्रोसाहित करण्याचे कामे करीत आहेत.
विस्तार अधिकारी बबलु आत्राम मुलचेरस येथे कार्यरत असताना रोजगार हमी योजने अंतर्गत सहा लाख एकोणीस हजार रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप असताना सुध्दा जिल्हा परिषद प्रशासनाने 12 वर्षाचा कालावधी लोटला असताना सुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाने त्याची अजून पर्यंत आर्थिक वसुली केलेली नाही.
बबलु आत्राम पंचायत समिती धानोरा येथे कार्यरत असून ग्रामसेवकांच्या चौकशीच्या माध्यमातून आपले हात पिवळे केलेले आहे.जिथे जातो. तिथेही आपले हात पिवळे करीत असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने बबलु आत्राम यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी चोखाजी ढवळे यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.