आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️जीवन गाणे..!

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

“जीवन गाणे”..!!

घेउनिया सपनांची लाली
हृदयीं माझ्या कशास आली,
तुला फसवले त्या भाग्याने
जीवनात ह्या आली खुशाली !

नाते अपुले आले जुळूनी
आता सावरू दोघे मिळूनी
परिस्थितीने जरी ग्रासले,
बघु न आता मागे सरूनी

ठेव भरोसा तुझ्या अंतरी,
झुलू सुखाच्या कधि अंबरी
सांग सखे ग शब्दा वाचूनी ?
सौख्य येई का तुझ्याच दारी ?

अनाथापरी जीवन माझे
मम दुःखाचे तुलाच ओझे,
घडू नये ते घडून गेले!
फुलते ग आयुष्यही तुझे !

खुशित गाऊ जीवन गाणे !
सुख दुःख तर जाणे येणे,
साथ तुझी ही मला लाभली
जगू सदाही अभिमानाने !

श्री. न. डोंगरे अमरावती
मो. न. ७८७५९९०५००

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.