आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी उद्योगांनी वॉटर टँकर उपलब्ध करावे : राजुरेड्डी

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.9405714165*

 

घुग्घूस : शहरातील प्रत्येक नागरिकांना पिण्याचा पाणी मिळावा यासाठी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी हे सदैव जीवाचा आटा – पिटा करीत असतात.
ते मागील दहा ते पंधरा वर्षांपासून नित्य – नियमाने जलसेवा देत आहेत त्यांचा हा समाज सेवेचा वसा कोरोना काळात ही थांबला नाही.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन शहरातील नागरिकांनी त्यांना ” जलसेवकाची’ उपाधी बहाल केली आहे.
शहरात दररोज त्यांचे अनेक वॉटर टँकर निःशुल्कपणे नागरिकांची तहान भागविण्याचे कार्य करीत आहे.

मात्र शहराची लोकसंख्या लक्षात घेता त्यांचे प्रयत्न कमी पडत असल्याने शहर काँग्रेसच्या वतीने
शहरातील उद्योगांनी देखील आपल्या उद्योगा तर्फे वॉटर टँकर देऊन शहराला मदतीचा हात द्यावा अशी मागणी काँग्रेस तर्फे निवेदनातून करण्यात आली आहे.

घुग्घूस हा जिल्ह्यातील प्रसिद्ध औद्योगिक शहर असून प्रदूषण व उष्णते मध्ये हा शहर सदैव पुढेंच असतो.
आता भीषण उन्हाळा सुरू झाला आहे शहरातील अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू झालेली आहे.
पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे
गरमी पासून संरक्षणासाठी कूलरची अत्यंत आवश्यकता असल्याने त्यासाठी ही पाण्याची नितांत आवश्यकता आहे.

शहरातील भीषण टंचाई लक्षात घेता अजून ही वॉटर टँकरची आवश्यकता असल्याने शहर काँग्रेसच्या वतीने एसीसी,लॉयड्स मेटल्स, गुप्ता कोल वॉशरीज, व वेकोली द्वारे प्रत्येकी दोन वॉटर टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी निवेदनातून केली आहे
तसेच नगरपरिषदेला ही या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.