▪️कुनघाडा रै येथील सेवा सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचा शुभारंभ..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
कुनघाडा रै – ( इंडिया 24 न्युज ) : सेवा सहकारी संस्था मर्यादित कुनघाडा रै येथील नवीन इमारतीचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष बाबुराव कुकडे व उपाध्यक्ष अशोक वडेट्टीवार यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाला अध्यक्ष बाबुराव कुकडे, उपाध्यक्ष अशोक वडेट्टीवार, दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक सी जी कुंभारे, रोखपाल कुमरे, लिपिक श्रद्धा संतोषवार, सेवा सहकारी संस्थेचे संचालक दयाळ भांडेकर, निलकंठ काटवे, विजय जुआरे, प्रल्हाद कुरुडकर, पत्रू सातपुते, शांताबाई किरमे, कासुबई चापडे, सेवा सहकारी संस्थेचे सचिव एच ए गुरनूले, शामराव कुनघाडकर, भाजप उपाध्यक्ष उमेश कुकडे, अतुल भांडेकर, लिपिक तेजस सातपुते, लिपिक संजय तोडासे, लीलीप इंगोले, वासुदेव कुनघाडकर, काशिनाथ कुनघाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कुनघाडा रै येथे अनेक वर्षापासून सेवा सहकारी संस्था अस्तित्वात असून, कार्यालयासाठी संस्थेच्या सर्व संचालकाच्या सहकार्याने यावर्षी जुन्याच इमारतीवर नवीन इमारत तयार करण्यात आली आहे.