ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आदिवासींचा विकास नको फक्त जल-जंगल-जमीन विकायची घाई : भाकपा

 

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गटटा – ( इंडिया 24 न्युज ) : येथील ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्र दिनांक ०४ जून २०२५ पासून नादुरुस्त अवस्थेत आहे आणि त्यामुळे या भागात नियमित वीजपुरवठा होत नाही.परिणामी.आदिवासी व ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन, पिण्याचे पाणी, शेतीपंप, आरोग्य केंद्रे आणि शिक्षण यावर गंभीर परिणाम झाला आहे.

या गंभीर परिस्थितीबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, किसान सभेचे कॉ. रमेश कवडो.तालुका सहसचिव कॉ. विशाल पूजजलवार, शहर सचिव कॉ. तेजस गुज्जलवार आणि AISF चे कॉ. सूरज जककुलवार यांनी महावितरण उपविभागीय अभियंता, एटापल्ली यांच्याकडे अधिकृत निवेदनाद्वारे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
कायमचा तोडगा’ फक्त बोलण्यातच २ जूनच्या चर्चेचा अवमान २ जून २०२५ रोजी गटटा येथे आंदोलनादरम्यान महावितरण अधिकाऱ्यांनी ‘कायमचा तोडगा’ काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा झाली नाही.ना वीज पुरवठा सुरळीत झाला ना दुरुस्तीचा ठोस प्रयत्न.हे आदिवासी जनतेच्या सहनशीलतेचा अपमान आहे.भाकपाची घणाघाती टीका सरकारचा हेतू विकास नसून लूट आहे
केंद्र आणि राज्य सरकारांना आदिवासींचा खरा विकास करायचा नाही. त्यांना फक्त या भागातील जल.जंगल आणि जमीन खाजगी कंपन्यांना विकून मोकळं व्हायचं आहे.असा स्पष्ट आरोप कॉ. सचिन मोतकुरवार यांनी केला.
वीज.पाणी.रस्ते.आरोग्य यांवर खर्च न करता केवळ खाणी.प्रकल्प यांसाठी जमीन हस्तांतर करणे हा यंत्रणेचा खरा उद्देश आहे.अशी टीका कॉ. तेजस गुज्जलवार यांनी केली.
संघर्ष हाच पर्याय–भाकपाचा इशारा
जर तात्काळ वीज दुरुस्ती झाली नाही.तर महावितरण कार्यालयांना घेराव गावनिहाय संघर्ष समित्या आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा भाकपा व संलग्न संघटनांनी दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.