ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, मुंबईच्या वतीने रत्नागिरी जिल्हास्तरीय कार्यकर्ता मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर संपन्न…

 

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

देवरूख-(इंडिया 24 न्यूज )माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबई ( RTI कार्यकर्त्यांची झुंजार संघटना) आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय कार्यकर्ता मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे चिपळूण येथे शिक्षण महर्षी गोविंदराव निकम सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर उत्साहात संपन्न झाले.

या शिबिराचे उद्घाटन माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबईचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी बसवेकर, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक, प्राध्यापक श्री कांबळे, महासंघाचे महाराष्ट्र सचिव समीर शिरवाडकर, जिल्हाध्यक्ष सुशांत मराठे, कार्याध्यक्ष रमजान गोलंदाज, संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव, चिपळूण तालुका अध्यक्ष स्वाती हडकर, महिला विभाग यांचेहस्ते छ.शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी आपली माहितीच्या अधिकारात केलेल्या कार्याची माहिती व येत असलेल्या अडचणी याबाबत उपस्थितांना आपले अनुभव सांगितले. त्यानंतर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी बसवेकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 01 ते 31 बाबत संक्षिप्त माहिती व प्रशिक्षण दिले. व भ्रष्टाचाराचा भस्मासुर आपण एकत्र येऊनच संपऊ शकतो, असे प्रतिपादन केले. प्रत्येक कार्यकर्त्या ने आपल्या गावातील कामांचा आढावा घेऊन आपला व गावा च्या विकासात हातभार लावणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणात चिपळूण गुहागर, रत्नागिरी, खेड राजापूर, दापोली, संगमेश्वर येथून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रशिक्षणात जवळ जवळ 100 ते 120 कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात गुहागर मधून आलेले अनेक कार्यकर्त्यांची सदस्यता नोंदणी करण्यात आली. त्यांचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी बसवेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष राज बोथरे यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने कार्याध्यक्ष शेखर जोगळे, मनोहर गुरव, विजय साळुंखे व राज बोथरे यांनी परिश्रम घेतले. शिक्षण महर्षी गोविंदराव निकम सभागृह कार्यक्रमाला उपलब्ध करून दिल्याबद्दल सचिव महेश महाडिक यांचे जिल्हा उपाध्यक्ष राज बोथरे यांनी आभार मानले तसेच उपस्थित मान्यवरांचे, पदाधिकारी यांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.