▪️घनसोलीतील भटक्या श्वानाचा उपचारावर डॉ. घनवट, परब, परिवेक्षक, अमित हुके, रोहित जाधव व कामगार, वॉर्ड बॉय संदीप शिरसाट यांचा दुर्लक्ष..
▪️मनमानी कारभार श्वान प्रेमींची त्रीव नाराजी महापालिका प्रशासन लक्ष देईल का ?

सुबोध सावंत :-मुंबई विभागीय प्रतिनिधी
नवी मुंबई – ( इंडिया 24 न्युज ) :महानगरपालिकेच्या
अखत्यारीत असलेल्या श्वान देखभाल केंद्र म्हणून तुर्भे येथील आईडिया सेंटर यांच्या कार्याविषयी शंका उपस्थित होत आहे. प्रिंट मिडिया मधून सुस्त कामांविषयी सतत बातम्या प्रसारित होत आहेत. त्या गोष्टीचा राग धरून घणसोली विभागातील भटक्या श्वानांची देखभाल करण्यास मनाई करीत आहे.
एका प्रकरणात , तीन दिवसांपूर्वी आयडिया सेंटर तुर्भे यांना भ्रमणध्वनी करून जखमी श्वानावर उपचार करण्यास बोलावले असता वेळेत न येणे उडवाउडवीची उत्तरे देणे असे प्रकारे वर्तन करीत आहेत. सतत मिडीयावर आईडिया सेंटरचा हलगर्जीपणा दाखवल्याने डॉक्टरांनी घणसोलीतील भटक्या श्वाना वर उपचार करायचा नाही असे तेथील कर्मचारी सांगत आहे. जर नवी मुंबई महानगरपालिका इतका खर्च करत असेल तर खाजगी आयडिया सेंटर यांची मनमानी महानगरपालिका का सहन करीत असेल. अस्य प्रकारे गैरवर्तन करून नवी मुंबईतील श्वान प्रेमींना वेठीस धरण्याचे काम करत आहे जर असंच वारंवार करत असतील तर घणसोलीतील भटके श्वान लवकरच दगावले जातील.श्वानप्रेमींनी गेले पंधरा दिवसांपूर्वी संबंधित डॉक्टर व वॉर्ड बॉय यांच्याविरुद्ध प्रिंट मीडियामध्ये बातमी प्रसारित केले म्हणून त्याचाच राग धरून या जखमी श्वानांवर उपचार केले जात नसल्याची भावना जनमाणसात उमटत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका व संबंधित विभागाने यावर कार्यवाही करावी.