आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अफवांना बळी पडू नका “यहोवा यिरे” संस्था सक्षम व सुरक्षित : डॉ. रमेशकुमार बोरकुटे

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि.15 मे 2026 “यहोवा यिरे बचत निधी लि.” व “यहोवा यिरे अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि.” या संस्थांबाबत काही दिवसांपासून पसरवल्या जात असलेल्या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी संस्थेचे सीईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी आज संस्थेच्या सभासदांची आमसभा घेऊन स्पष्ट व ठाम भूमिका मांडली. या सभेमुळे सभासदांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात दूर झाले.

गेल्या काही महिन्यांपासून काही असामाजिक प्रवृत्तीच्या व्यक्तींनी व माजी कर्मचाऱ्यांनी संस्थेबाबत चुकीची माहिती पसरवत “संस्था बुडाली”, “सीईओ पळून गेले”, “पैसे सुरक्षित नाहीत” अशा खोट्या अफवा बाजारात पसरवल्या. यामुळे सभासद व ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि संस्थेच्या नियमित व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला.

डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी सभेत स्पष्ट सांगितले की, संस्थेचे सर्व व्यवहार पारदर्शक असून सभासदांची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. संस्था कुठेही बुडालेली नाही किंवा बंद झालेली नाही. काही कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार व विश्वासघात केल्याचे निदर्शनास आले असून, संबंधितांविरुद्ध कायदेशीर व फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

संस्थेची बदनामी करून व्यवहारांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे कलेक्शन प्रक्रियेवर परिणाम झाला आणि त्यामुळे काही काळ विड्रॉल प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या. मात्र संस्था पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून पुढील 6 ते 7 महिन्यांत परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईल, असा विश्वास डॉ. बोरकुटे यांनी व्यक्त केला.

सभासदांनी देखील संस्थेवर विश्वास व्यक्त करत संस्थेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सभेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

शेवटी डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी सर्व सभासद, ग्राहक व कर्मचारी वर्गाला आवाहन केले की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीसाठी थेट संस्थेशी संपर्क साधावा. “यहोवा यिरे” संस्था ही सभासदांच्या विश्वासावर उभी असून, प्रत्येक सभासदाचा पैसा सुरक्षित ठेवणे हीच संस्थेची सर्वोच्च जबाबदारी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.