▪️महसूल सप्ताहात महाराजस्व अभियान..
▪️महसूल सप्ताहात आपली अडलेली कामे मार्गी लावण्याची संधी : तहसीलदार मृदूला मोरे

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र.९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४न्यूज ) : चंद्रपूर जिल्ह्यात महसूल सप्ताहाचे निमित्ताने दिनांक ४ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबविण्यात आले व त्या अंतर्गत या महसूल सप्ताहात मूल तालुक्यातील ५ मंडळांमध्ये एकाच दिवशी विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
मूल मंडळातील ताडाळा तुकूम, चिरोली मंडळात चिरोली येथे, चिखली मंडळातील भादुर्णा येथे ,राजगड मंडळातील राजगड व बेंबाळ मंडळातील भेजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचे आयोजन महसूल सप्ताह अंतर्गत राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये नागरिकांना वेगवेगळ्या सेवा एकाच ठिकाणी व तात्काळ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार होत्या यांत १) प्रलंबित फेरफार निकाली काढणे २) विविध प्रकारचे दाखले / प्रमाणपत्र वाटप करणे ३) शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पुरविणे,नागरीकांना लाभदायक ठरणारे शासनाचे महत्वाचे कायद्याची माहिती , विकास योजनाची माहिती पुरविणे याबाबत नियोजन करण्यात आले होते .
अर्ज केल्यानंतर लगेच वेगवेगळे दाखले मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती , त्यासाठी सेतू केंद्र चालक या कार्यक्रमात उपस्थित होते.
मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे, जागृत ग्राहक राजा चे विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे, रमेश डांगरे, डॉ आनंदराव कुळे, तुळशीराम बांगरे, नायब तहसीलदार विजय पंदिले,नायब तहसीलदार दिनेश पवार,पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी राजेश शिरभाते, राहूल मुरकुटे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना व नागरिकांना या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
१ ते ७ ऑगस्ट या कालावधीत मूल तहसील कार्यालयातर्फे तालुक्यात महसूल सप्ताह राबविण्यात येत आहे. यावेळी मंडळ अधिकारी , ग्राम महसूल अधिकारी, सेतू केंन्द्र चालक, पोलिसपाटील, कृषी सहायक, कोतवाल, व लाभार्थी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन शेतकऱ्यांच्या शेतीच्या संबंधाने असतांना सुद्धा शेती निगडित भूमी अभिलेख कार्यालयाचे कोणतेही कर्मचारी वा अधिकारी सदर कार्यक्रमास हजर नव्हते. हे विशेष!