▪️संघर्ष, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव; सागर शंभरकर यांना “स्वामी विवेकानंद जी सोशल रिफॉर्मर अवॉर्ड”

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
नागभीड ( इंडिया 24 न्युज ) : समाजकारण, शिक्षण क्षेत्रातील जनजागृती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा उभारणारे सागर सुमित्रा-तारानाथ शंभरकर यांना “Swami Vivekananda Ji Social Reformer Award” प्रदान करून गौरविण्यात आले आहे. उत्तराखंड येथील Honest Foundation संस्थेकडून हा सन्मान देण्यात आला असून, त्यांच्या प्रेरणादायी कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून काम करताना सागर शंभरकर यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविला. ग्रामीण भागातील शैक्षणिक समस्या, अन्यायग्रस्त नागरिकांचे प्रश्न, सामाजिक जनजागृती आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना न्याय मिळण्यास मदत झाली असून, समाजात जागृती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या कार्याचा गौरव यापूर्वीही शासन स्तरावर करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने सन 2009 मध्ये शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी त्यांना “राज्य शिक्षक पुरस्कार” प्रदान केला होता. तसेच जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी सन 2007 मध्ये त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित केले होते.
“स्वामी विवेकानंद जी सोशल रिफॉर्मर अवॉर्ड” प्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार, समाजाला वैचारिक बळ देणारे आणि राष्ट्रहितासाठी योगदान देणारे त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील, असे गौरवोद्गार काढण्यात आले आहेत.
त्यांच्या या यशामुळे नागभीड तालुक्यासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजासाठी निस्वार्थपणे झटणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.



